नगरमध्ये तिळ्यांचा जन्म; नगरमधील शिंदे हॉस्पिटलमध्ये टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाने जन्माला आलेली ही तीन मुले. गर्भाचा कालावधी वाढ...
नगरमध्ये तिळ्यांचा जन्म;

नगरमधील शिंदे हॉस्पिटलमध्ये टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाने जन्माला आलेली ही तीन मुले. गर्भाचा कालावधी वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीन्ही बाळं आडवे असल्यामुळे व पाणी कमी झाल्यामुळे ३४ आठवड्यात प्रसूति करावी लागली. बाळांचे वजन पावणेदोन किलो असून, प्रकृती चांगली आहे.
-डॉ. बन्सी शिंदे, डॉ. स्मिता शिंदे, स्त्रीरोग तज्ज्ञ अहमदनगर : लग्नानंतर सात वर्षे अपत्यप्राप्ती नसलेल्या एका महिलेच्या पोटी तिळ्या मुलांचा जन्म झाला असून, विशेष म्हणजे आईसह या तीनही बाळांची प्रकृती सुदृढ आहे.
शर्मिला (नाव बदललेले आहे) यांचा बाविसाव्या वर्षी विवाह झाला. सात वर्ष झाली तरी त्यांना अपत्यप्राप्ती होत नव्हती. त्यामुळे त्यांनी विविध ठिकाणी उपचार घेतले. मात्र, अपत्यप्राप्ती झाली नाही. सातत्याने सात वर्ष उपचार घेतल्यानंतर त्यांनी नगरमधील शिंदे हॉस्पिटलमध्ये टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचं ठरविलं. त्यानुसार उपचार सुरु केले. तीन महिन्याच्या प्राथमिक उपचारानंतर टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाने तयार केलेले गर्भ शर्मिलाच्या गर्भपिशवीत सोडण्यात आला. हा गर्भ वाढीस लागला. मात्र, सोनोग्राफी केल्यानंतर तीन गर्भांची वाढ झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टर बन्सी शिंदे व डॉ. स्मिता शिंदे यांनी यातील एक मूल कमी (एमब्रीयो रिडक्शन) करण्याचा सल्ला संबंधित दाम्पत्याला दिला होता. मात्र, त्यास नकार दिला. त्यानंतर डॉ. शिंदे यांनी पुढील उपचार सुरु केले.
गर्भधारणेनंतर आठव्या महिन्यात (३४ आठवडे) मंगळवारी प्रसूति झाली. तीनही मुले जन्माला आल्याचे पाहून या दाम्पत्यासह नातेवाईकांना मोठा आनंद झाला. यातील पहिला मुलगा १७00 ग्रॅमचा तर दुसरा व तिसरा मुलगा प्रत्येकी १८00 ग्रॅम वजनाचा आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या तीनही मुलांची प्रकृती चांगली आहे. सध्या या महिलेचे वय तीस आ
हे
|









