नाथसागर जलाशयाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ राज्यभरात पावसाचा जोर वाढला; गोदावरीला महापूर?! गंगापूर - ४२ हजार ६४२ क्यूसेस दारण...
नाथसागर जलाशयाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ
राज्यभरात पावसाचा जोर वाढला;
गोदावरीला महापूर?!

गंगापूर - ४२ हजार ६४२ क्यूसेस
दारणा - ३४ हजार क्यूसेस
पालखेड - १४ हजार ५0९ क्यूसेस
कडवा - २१ हजार ४६२ क्यूसेस
पुणेगाव - २ हजार ८१७ क्यूसेस
चणकापूर - १0 हजार क्यूसेस
वालदेवी - १ हजार ५0 क्यूसेस
वरपैठण : पाणलोट क्षेत्रात, नाशिक जिल्ह्यात व परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे पैठणच्या नाथसागर धरणात जवळपास एक लाख पंचवीस हजार क्यूसेक्स पाण्याची आवक होत असल्याने पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी धरणाची पाणीपातळी जिवंत होणार असल्याची माहिती धरणाचे अभियंता अशोक चव्हाणपुणे : राज्यात मंगळवारी बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. परिणामी राज्यातील बहुतांश नद्यांना पूर आले होते. नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरात पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीपात्रातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेल्याचे चित्र मंगळवारी पाहण्यास मिळाले. सगळीकडे सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी (ता. ३) कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गुरूवारपासून मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात जोर ओसरण्याची शक्यता आहे. तर कोकण आणि विदर्भात शनिवारपयर्ंत जोरदार पावसाचा इशारा कायम असल्याचेनाशिक : सूर्याच्या पुष्य नक्षत्रात मुसळधार हजेरी लावणार्या पावसाने मंगळवारी आश्लेषा नक्षत्रात प्रवेश केला अन् मध्यरात्रीपासूनच राज्यासह जिल्ह्याला झोडपण्यास सुरुवात केली. बघता बघता पावसाने रौद्ररूप धारण केले अन् गोदामाईदेखील कोपली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर, दारणा, पालखेड, वाघाड, पुणेगाव व भावली धरणांतून हजारो क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे. त्यामुळे नांदूर मध्यमेश्वरमधून जायकवाडीसाठी जवळपास १ लाख ५६ हजार क्यूसेस इतक्या मोठय़ा प्रमाणावर विसर्ग करण्यात येतो आहे. दरम्यान, संततधार अशीच सुरू राहिल्यास धरणातील विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनीही गंगापूर, वैजापूर व पैठण तालुक्यांतील गावांना संभाव्य धोका लक्षात घेऊन सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत









