फिरोदिया व भालेराव यांच्या स्मरणार्थ आयोजित भक्तिसुमन गीत स्पर्धांना प्रतिसाद द्वेष व्यक्तिमत्त्व विकासातील अडथळा : डॉ. शरद कोलते...
फिरोदिया व भालेराव यांच्या स्मरणार्थ आयोजित भक्तिसुमन गीत स्पर्धांना प्रतिसाद
द्वेष व्यक्तिमत्त्व विकासातील
अडथळा : डॉ. शरद कोलते
अहमदनगर ;
![]()
दुसर्याचा द्वेष हा आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासात अडथळा ठरतो. जीवनात यशाने हरळून जाऊ नये, तर अपयशाने खचून जाऊ नये, असे मत आयएमएसचे सरसंचालक डॉ. शरद कोलते यांनी व्यक्त केले. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत प्रमुख कार्यवाह अशोकभाऊ फिरोदिया व दिवंगत सहकार्यवाह सुरेश भालेराव यांच्या स्मरणार्थ आयोजित भक्तिसुमन स्पर्धेच्या परितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. कोलते म्हणाले, काळ बदलतो, तसे जग बदलत आहे. आधुनिकता आणि परंपरा यांचा समन्वय साधण्याचे काम शाळांना करावे लागणार आहे. फिरोदिया परिवाराने एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी राबविलेले उपक्रमांचे यावेळी त्यांनी कौतुक केले.
संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छाया फिरोदिया, प्रतिभा धूत, गौरव फिरोदिया, कल्याणी फिरोदिया, आशा फिरोदिया, सुनंदा भालेराव, अशोक मुथा, शरद रच्चा, डॉ.जयंत निसळ, रमेश सारडा, नंदकुमार झंवर, कलीम र्मचंट, पवन नाईक, डॉ. मधुसूदन बोपर्डीकर, किर्तीदेवी खरवंडीकर, गोपाळराव मिरीकर, रघुनाथ केसकर आदी यावेळी उपस्थित होते. भक्तिसुमन गीतांची स्पर्धा दोन दिवस सुरू राहिली.
गायत्री शिंदे, दिप्ती खरवंडीकर, संकेत सावंत यांनी लहान गटात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविले. शाल्मली भालेकर व महेश लोखंडे यांना उत्तेजनार्थ, तर समृद्धी वैकर व कृष्ण नरोडे यांना प्रेरणा पारितोषिकाने गौरविण्यात आले. श्रेया कुलकर्णी, प्रज्ञा चौधरी, श्रृती कलापुरेकल यांनी मोठय़ा गटात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविले. ज्ञानेश्वरी पंडित व देवयानी झरेकर यांना उत्तेजनार्थ, तर यश वाडेकर व प्रतिक्षा बनकर यांना प्रेरणा पारितोषिकाने गौरविण्यात आले.
तय्यब शेख, आदेश चव्हाण, प्राची पाठक यांना खुल्या गटातून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविला. निनाद पारखी व एकनाथ काळे यांना उत्तेजनार्थ, तर ओंकार देऊळगावकर व रामेश्वर देशमुख यांना प्रेरणा पारितोषिकाने गौरविण्यात आले. पुणे येथील डॉ. रसिका एकबोटे, डॉ. अंजली दाणी व अश्विनी गोखले यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. अशोकभाऊ फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व अहमदनगर एज्युकेशन सोसायटीतर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. मधुसूदन बोपर्डीकर, डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर, डॉ. गोपाळराव मिरीकर व रघुनाथ केसकर यांना यावेळी गीैरविण्यात आले. गीतांजली भावे यांनी सूत्रसंचालन केले. सुनंदा भालेराव यांनी आभार मानले.
|










