Archive Pages Design$type=blogging

पोलिसांच्या मद्यपानाचा अहवाल 'निगेटिव्ह'

पोलिसांच्या मद्यपानाचा अहवाल 'निगेटिव्ह; ' ■ पोलिसांवर कामाचा मोठा ताण आहे. अशा परिस्थितीत कुठे गुन्हा घडला तर पोलीस तातडीने...


पोलिसांच्या मद्यपानाचा अहवाल 'निगेटिव्ह;
'
■ पोलिसांवर कामाचा मोठा ताण आहे. अशा परिस्थितीत कुठे गुन्हा घडला तर पोलीस तातडीने तेथे दाखल होतात मात्र, पोलिसांवरच खोटे आरोप झाले तर त्यांचे मानसिक खच्चीकरण होते. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना समजून घेत त्यांनाही सहकार्य करणे गरजेचे आहे असे मत पोलीस कर्मचार्‍यांमधून व्यक्त होत आहे. अहमदनगर : कर्जत तालुक्यातील भांबोरा येथे अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या आरोपींना ताब्यात घेण्यास गेलेल्या पोलिसांनी मद्यपान केले असल्याचा आरोप करत त्यांना सहा तास गावात डांबून ठेवण्यात आले होते. वैद्यकीय अहवालात मात्र, त्या तिनही पोलीस कर्मचार्‍यांनी मद्यपान केले नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान या पोलिसांचे निलंबन मागे घेण्याबाबत फेरविचार करण्यात येणार असल्याचे कर्जतचे पोलीस उपाधीक्षक विजय लगारे यांनी सांगितले.
कर्जत तालुक्यातील भांबोरा येथे २९ जुलै रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणार्‍या आरोपींना ग्रामस्थांनी पकडून गावातील ग्रामपंचायत कार्यालयात कैद केले होते. याबाबत कर्जत पोलिसांना माहिती देण्यात आली होती. यावेळी पोलीस हवालदार एम.वाय. सय्यद, के. एच. निमसे व पोलीस शिपाई के. एफ. कोळेकर हे भांबोरा येथे आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेले होते. यावेळी मात्र, ग्रामस्थांनी पोलीस दारु पिलेले आहेत. असा आरोप करत त्यांनाही आरोपीसह ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवले होते. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी व उपाधीक्षक विजय लगारे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले. यावेळी ग्रामस्थांनी सदर तीन पोलिसांना निलंबित करावे, अशी मागणी केली होती. यावेळी पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी सय्यद, निकम व कोळेकर यांना निलंबित केले असल्याचे जाहीर केले. घटनेनंतर या तिनही पोलीस कर्मचार्‍यांच्या वैद्यकीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी रक्ताचे नमुने घेतले होते. हा अहवाल रविवारी पोलिसांना प्राप्त झाला असून, त्यामध्ये सदर कर्मचार्‍यांच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल आढळून आले नसल्याचे नमूद आहे, असेही लगारे यांनी सांगितले

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: पोलिसांच्या मद्यपानाचा अहवाल 'निगेटिव्ह'
पोलिसांच्या मद्यपानाचा अहवाल 'निगेटिव्ह'
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEitHOA8FGImKt0ELU19VyKLwmOdOeyb_aVjZW7x0ycmu8J5W6leVpQHb-YvenNM6kABanUeO_eWxz4zRFsZXf-KcN6zCpXJ1nYJrghG-Og6P1g1Qs6GvXGh-74GrbLQ7bc9ucbps_tEvOjv/s200/Lss+news.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEitHOA8FGImKt0ELU19VyKLwmOdOeyb_aVjZW7x0ycmu8J5W6leVpQHb-YvenNM6kABanUeO_eWxz4zRFsZXf-KcN6zCpXJ1nYJrghG-Og6P1g1Qs6GvXGh-74GrbLQ7bc9ucbps_tEvOjv/s72-c/Lss+news.png
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_91.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_91.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago