सुसरे शाळेत शालेय साहित्याचे वाटप; आदिनाथनगर/; गणवेश, वह्या, पुस्तके व इतर पूरक शालेय साहित्यांची मोफत भेट मिळाल्याने सुसरे (ता....
सुसरे शाळेत शालेय साहित्याचे वाटप;
आदिनाथनगर/;

गणवेश, वह्या, पुस्तके व इतर पूरक शालेय साहित्यांची मोफत भेट मिळाल्याने सुसरे (ता.पाथर्डी) येथील भिकीबाई गुगळे विद्यालयाच्या गरीब, गरजू, होतकरु मुला-मुलींचे चेहरे उजळले. सर तुमच्या मदतीने आमची शिक्षणाची उमेद वाढली, आम्ही स्वत:सह शाळेचेही नाव उज्वल करु, अशा स्वागत गीताच्या बोलाने मान्यवरांचा स्वरही यावेळी कातर झाला.
याप्रसंगी सरपंच दत्तात्रय कंठाळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिशु संगोपन संस्थेचे कार्यवाह र.धो.कासवा, विश्वस्त मनसुखलाल पिपाडा, चंद्रकांत आनेचा, सामाजिक कार्यकर्ते बबनराव उदागे, बापूसाहेब पिसोरे, ग्रामपंचायत सदस्या नंदाताई हिंगे आदी मान्यवर मंचावर होते.
यावेळी कासवा म्हणाले, थेट गरजूंच्या पदरी मदत पोहोचणे महत्वाचे आहे. मदत आणि दान करण्याच्या अनेक रुढरिती आहेत, पण योग्य वेळ आणि निकडीच्या स्थितीत बालवयात मदतीची मिळालेली माया विद्यार्थी कधीच विसरत नाही. त्या संधीचे ते सोनेच करतात.सरपंच कंठाळी यांनी शालेय खेळात प्राविण्य असलेल्या मुलींना खेळासाठीचे पूरक गणवेश दिले. प्रास्तविक मुख्याध्यापक अशोक सपाटे यांनी केले तर अशोक मिसाळ यांनी आभार मानले. रमेश लोंढे, जनार्धन कंठाळी, भिकाजी गावडे, भास्कर जगताप, ओमप्रकाश मोरे, मोहन दातीर, सुषमा गायकवाड, बीना काळे आदींसह ग्रामस्थ याप्रसंगी हजर होते









