महावीर मंडळातर्फे महिलेला शिलाई मशिनची भेट; अहमदनगर ; समाज कार्याचा ध्यास घेतलेल्या श्री जय आनंद महावीर युवक मंडळाने रक्षा...
महावीर मंडळातर्फे
महिलेला शिलाई मशिनची भेट;
अहमदनगर ;
![]()
समाज कार्याचा ध्यास घेतलेल्या श्री जय आनंद महावीर युवक मंडळाने रक्षाबंधनाच्या औचित्य साधून गरजू व कष्टाळू महिला सविता सचिन मुनोत यांना त्यांच्या संसाराला मदतीचा हात म्हणून शिलाई मशिनची भेट दिली.
मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, एमआयडीसीमधील शीतल इंडस्ट्रीजचे संचालक संजय जग्गी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. मंडळाचे सचिव सत्येन मुथा, मनीष गुगळे, प्रमोद डागा, कुंतीलाल राका, माजी सचिव मनोज गुंदेचा, मनोज बोरा, योगेश मुनोत, सुशील फिरोदिया, वांबोरीचे व्यापारी बापू गांधी आदी उपस्थित होते. सविता मुनोत यांनी या अनोख्या भेटीचे स्वागत करुन जय आनंद महावीर मंडळाचे सदस्य माझ्यासाठी बंधू म्हणून उभे राहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. महावीर युवक मंडळाने रक्षाबंधनाच्या पार्श्वाभूमीवर सर्वांसमोर आदर्श ठेवल्याचे सांगत मुनोत यावेळी भावुक झाल्या होत्या. महावीर युवक मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
|










