Archive Pages Design$type=blogging

मदत निधीसोबतच बालमित्रांचे मान्यवरांकडून कौतुक पारनेरकर युवा मंचचा एक पथदश्री सामाजिक उपक्रम

मदत निधीसोबतच बालमित्रांचे मान्यवरांकडून कौतुक पारनेरकर युवा मंचचा एक पथदश्री सामाजिक उपक्रम सुपा; पारनेर तालुक्यातील निराधार,...


मदत निधीसोबतच बालमित्रांचे मान्यवरांकडून कौतुक
पारनेरकर युवा मंचचा एक पथदश्री सामाजिक उपक्रम
सुपा;
पारनेर तालुक्यातील निराधार,अपंग,होतकरू गरजू विद्यार्थ्यांना अर्थसहाय ,शैक्षणिक मार्गदर्शन व त्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या पारनेरकर युवा विकास मंचच्या वतीने १0५ विद्यार्थ्यांना एक लाख पंचवीस हजार रुपयांचे धनादेश व वस्तूंचे वाटप करण्यात आले.
पारनेर येथील आनंद लॉन्स मंगलकार्यालयात दि ७ रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी संतोष भोर होते. या निमित्त नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, डॉ.रफिक सय्यद, तहसीलदार भरती सागरे, प्राचार्या यु.डी. रोहकले, प्रा.शिक्षक बँकेचे चेअरमन रावसाहेब रोहकले, शिक्षकनेते रा. या. औटी, प्रा.गटशिक्षणअधिकारी जगन्नाथ खामकर, विस्तार अधिकारी संभाजी झावरे, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय वाघमारे, दत्ता झगडे, विनोद गोळे, मछिंद्र गाजरे आदींसह तालुक्यातील विद्यार्थी,पालक,शिक्षक उपस्थित होते. या वेळी पवारवाडी (सुपा)शाळेचे शिक्षक ज्ञानेश्‍वर इंगळे लिखित, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ज्ञानरचनावादी अध्ययन व अध्यापणास उपयुक्त असलेल्या ज्ञानरचनावादी बालमित्र,या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
पहिली ते पदवी पर्यंत शिक्षण प्रवाहात असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना देण्यात आलेला पाचशे ते सात हजाराच्या निधीचा धनादेश आमच्यासाठी खूप मोठा आधारस्तंभ ठरला असल्याचे विद्यार्थी व पालकांनी सांगितले.
प्रांताधिकार भोर यांनी,युवा मंचचा हा उपक्रम जिल्ह्यासह राज्याला ही पथदश्री असल्याचे सांगितले. कुलगुरू पठाण व तहसीलदार सागरे यांनी जीवनातील अनेक सुखदु:खाच्या क्षणाला सामोरे जात अडचणींवर जो मत करतो तो यशस्वी होतो असे सांगितले.गटशिक्षणाधिकारी खामकर म्हणाले की, निसर्गाने जे काही दिले ते आनंदाने स्वीकारावे. चांगले काही तरी करण्याचा संकल्प करा.
तरुण हा समाजाच्या पाठीचा कणा असून कणा सरळ तर पेशंट सरळ,सध्याची तरुण पिढी भरकटत असताना त्यांच्यासाठी मोलाचे काम हे युवक करत आहेत. त्यांच्या या उपक्रमाला सवरेतोपरी साथ देण्याचे आश्‍वासन डॉ.सय्यद यांनी दिले.
या वेळी जादूगार प्रकाश शिरोळे यांनी विद्यार्थ्यांना विविध जादूचे प्रयोग दाखवले.
कार्यक्रम नियोजनासाठी बाबूराव कदम, ज्ञानेश्‍वर इंगळे, प्रवीण गायकवाड, प्राजक्त झावरे, एल.पी.नरसाळे, प्रा.अजित दिवटे, प्रवीण ठुबे, मार्तंड बुचुडे, सज्रेराव बागल, प्रशांत दिघे, सतीश भालेकर, संजय रेपाळे, युवराज भाईक आदींसह सर्व युवा मंचच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले, प्रास्ताविक बाबूराव कदम यांनी तर सूत्रसंचालन ज्ञानेश्‍वर इंगळे यांनी केले.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: मदत निधीसोबतच बालमित्रांचे मान्यवरांकडून कौतुक पारनेरकर युवा मंचचा एक पथदश्री सामाजिक उपक्रम
मदत निधीसोबतच बालमित्रांचे मान्यवरांकडून कौतुक पारनेरकर युवा मंचचा एक पथदश्री सामाजिक उपक्रम
http://epunyanagari.com/epaperimages/08082016/08082016-md-ah-7-1414-1-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_95.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_95.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago