जेऊर येथे कडबाकुट्टी मशीनचे वाटप; (- नगर तालुक्यातील जेऊर येथे सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव गवारे यांच्या ...
जेऊर येथे कडबाकुट्टी मशीनचे वाटप;
![]()
(- नगर तालुक्यातील जेऊर येथे सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव गवारे यांच्या हस्ते कडबा कुट्टी मशीनचे वाटप करण्यात आले. जेऊर येथील पशु वैद्यकीय दवाखान्यामध्ये झालेल्या कार्यक्रमास जेऊर गावचे सरपंच मधुकर मगर, उपसरपंच गणोश पवार, मजले चिंचोली उपसरपंच धर्मनाथ आव्हाड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डौले, अनिल मगर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जेऊर गटातील २६ लाभार्थींना तर जेऊर गावातील ९ लाभार्थींना विज़ेवरील कडबा कुट्टीचे वाटप करण्यात आले. जेऊर पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वतीने दि. १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान राष्ट्रीय पशुधन विमा योजनेचा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. त्याचेही अनावरण सरपंच मधुकर मगर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डौले यांनी राष्ट्रीय पशुधन विमा योजनेची माहिती दिली. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ. डौले यांनी केले
|










