क्रांती दिनानिमित्त भुईकोट किल्ल्यात वृक्षारोपण; अहमदनगर- क्रांती दिनानिमित्त शहर व भिंगार कॉंगेसतर्फे ऐतिहासिक भोईकोट किल्ला य...
क्रांती दिनानिमित्त भुईकोट किल्ल्यात वृक्षारोपण;
![]()
अहमदनगर-
क्रांती दिनानिमित्त शहर व भिंगार कॉंगेसतर्फे ऐतिहासिक भोईकोट किल्ला येथे वृक्षारोपण करण्यात आले. युवक कॉंगेस प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे, शहर जिल्हा अध्यक्ष दीप चव्हाण, भिंगार शहर अध्यक्ष आर. आर. पिल्ले, निजाम जहांगीरदार, गौरव ढोणे, अमोल जाधव, स्वप्निल दगडे, उबेद शेख, बाळासाहेब भंडारी, नलिनी गायकवाड, सुनिता बागडे, मनोज गुंदेचा, शामराव वागस्कर, अनिल धाडगे, जमिला शेख, मोबीन शेख, दानेश, महेश ठुबे, अँड़ रावसाहेब चौधरी, लक्ष्मण साखरे, अँड़ नरेंद भिंगारदिवे, विवेक येवले, रोहित पवार उपस्थित होते. भारताला देशाचे स्वरूप देण्याचे काम कॉंगेसने केले आहे. अहमदनगर किल्ल्यामध्ये स्वातंत्र्यानंतर भारत कसे चालवायचे याचे नियोजन १२ क्रांतीकार यांनी केले होते. शहरामध्ये भारताचा इतिहास सांगण्यासाठी अभियान राबविले पाहिजे व जनजागृती करणे गरजेचे असे मत तांबे यांनी व्यक्त केले.
|










