फिनिक्स फाउंडेशनच्या शिबिरात ५३८ रुग्णांची नेत्र तपासणी; अहमदनगर; फिनिक्स सोलश फाउंडेशनतर्फे मोफत मोतीबिंदू शिबिरात ५३८ रुग्...
फिनिक्स फाउंडेशनच्या
शिबिरात ५३८ रुग्णांची नेत्र तपासणी;
अहमदनगर;
![]()
फिनिक्स सोलश फाउंडेशनतर्फे मोफत मोतीबिंदू शिबिरात ५३८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष योगीराज खोंडे यांच्या हस्ते या शिबिराचे उद.घाटन झाले. पाटबंधारे विभागाचे उपअभियंता रामराजे भोसले, अध्यक्ष जालिंदर बोरुडे, श्रीकांत शिर्शिकर, सुभाष तळेकर, विलास पेद्रमा, मोहन कुरे, डॉ. संभाजी मोरे, संजय मेहेर आदी उपस्थित होते. या शिबिरातील ११८ रुग्णांवर पुणे येथील बुधराणी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे जालिंदर बोरुडे यांनी सांगितले.
वैद्यकिय क्षेत्रात दररोज नवनवीन बदल होत आहे. महागड्या व अत्याधुनिक मशिनरीच्या सहाय्याने रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तरी प्रत्येकाला हे उपचार घेणे परवडणारे नाही. अशा परिस्थितीत फिनिक्स फौंडेशनने मोफत शिबिरे घेवून सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम केले आहे. तसेच त्यांनी या कार्याची ज्योती लावली हे सुरु ठेवणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य असल्याचे योगीराज खोंडे यांनी यावेळी मत व्यक्त केले.
|










