कर्जतला ग्रामसेवकांचे काम बंद; आंबिजळगाव येथील घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी कर्जत तालुका ग्रामसेवक संघटनेच्यावतीने काम बंद करून ...
कर्जतला ग्रामसेवकांचे काम बंद;
![]()
आंबिजळगाव येथील घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी कर्जत तालुका ग्रामसेवक संघटनेच्यावतीने काम बंद करून कर्जतमध्ये धरणे आंदोलन केले. कर्जत : तालुक्यातील आंबिजळगांव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी कर्जत तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने काम बंद करून कर्जतमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.
यामुळे संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे. आरोपींना अटक करण्यात यावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. तालुक्यातील आंबिजळगांव येथील ग्रामसेविका संगीता दादा घोडेकर यांना गुरुवारी सकाळी आंबिजळगांव ग्रामपंचायत कार्यालयात घरपट्टी व पाणीपट्टीची कर मागणी केल्याच्या कारणावरून अनिल उत्तम निकत व फिरोज पोपट शेख यांनी अरेरावी करून धक्काबुक्की केली. याप्रकरणी संगीता घोडेकर यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तालुक्यातील ग्रामसेवकांना अशा घटनांना वारंवार सामोरे जावे लागते आहे. महिला ग्रामसेविकेच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे . या घटनेतील आरोपींना अटक करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
आंदोलनात तालुक्यातील सर्व ग्रामसेवक सहभागी झाले आहेत. यामुळे संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे. आंदोलनाला कर्जत पंचायत समिती कार्यालयातील सर्व कर्मचारी व अधिकार्यांनी पाठींबा दर्शविला आहे. या आंदोलनात कर्जत तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष कैलास तरटे, ग्रामसेवक चंद्रकांत तापकीर, अमृत शेवाळे, सुनील मिसाळ, शरद कवडे, श्याम भोसले, लाला ढोबे सर्व महिला ग्रामसेवक सहभागी झाले आहेत.
पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र आंदोलनकर्ते आरोपीच्या अटकेच्या मागणीवर ठाम राहिले. त्यामुळे हे आंदोलन सुरू आहे. आरोपींना अटक न केल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
|










