Archive Pages Design$type=blogging

साईसंस्थानला मिळाला साठवण तलाव भेट

    साईसंस्थानला मिळाला साठवण तलाव भेट साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे व महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाचे प्रमुख विजय कार्ला यांच्य...


   
साईसंस्थानला मिळाला
साठवण तलाव भेट


साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे व महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाचे प्रमुख विजय कार्ला यांच्या हस्ते साठवण तलावाचे लोकार्पण झाले. शिर्डी : साईंना सोने, चांदी, पैशाच्या देणग्या येत असतांना संस्थानची मूलभूत गरज ओळखून महिंद्रा अँण्ड महिंद्रा उद्योग समूहाने २ कोटी १५ लाख रुपये खर्च करुन साईसंस्थानला पाण्याचा साठवण तलावदेणगीस्वरूपात दिला आहे.
जलपूजन करून संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे व महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाच्या उत्पादन विभागाचे प्रमुख विजय कार्ला यांनी या सतलावाचे भक्तार्पण केले.
कनकुरी शिवारातील साईबाबा संस्थान मालकीच्या ५ एकर जागेत सुमारे २ कोटी १५ लाख रुपये खर्च करुन महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीने सदर तलाव बांधून दिला आहे. या तलावाची साठवण क्षमता ४ कोटी २0 लाख लीटरची असून तलावाची लांबी १२१ मीटर, रुंदी १0५ मीटर व खोली ३.८ मीटर आहे. तलावाचे काम केवळ ९0 दिवसात पूर्ण करण्यात आले. प्रास्तविक कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी केले.
उदघाटन प्रसंगी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्‍वस्त भाऊसाहेब वाकचौरे, बिपिन कोल्हे, मोहन जयकर, प्रताप भोसले, सचिन तांबे, राजेंद्र सिंग, नगराध्यक्षा अनिता जगताप, उपकार्यकारी अधिकारी संदिप आहेर, महिंद्रा उद्योग समुहाचे उपाध्यक्ष विजय नायर, उपाध्यक्ष हिरामण आहेर, वरिष्ठ मुख्य व्यवस्थापक संदिप कुलकर्णी, मुख्य व्यवस्थापक नाँरबर्ट डिसुजा, उपमुख्य व्यवस्थापक कर्नल चंद्रा बॅनर्जी, वरिष्ठ व्यवस्थापक रविंद वाघ, हिमांशु गुप्ता, उपव्यवस्थापक सतिष बिल्दीकर, मयुर संत, संजय रोडे, महेश बिरारी आदी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष हावरे म्हणाले की, साईबाबा संस्थानला दानरुपी दिलेल्या या तलावाचा लाभ शिर्डीत येणार्‍या साईभक्तांना होईल. महिंद्रा उद्योग समुहाने केलेले हे राष्ट्रीय कार्य असून तलावात टाकलेल्या प्लास्टीक कागदाच्या आच्छादनामुळे तलावातील पाणी गळती होणार नाही. मात्र पाण्याचे बाष्पीभवन थांबविण्याचे संशोधन होणे गरजेचे आहे. यावेळी कंपनीचे उत्पादन प्रमुख विजय कार्ला यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: साईसंस्थानला मिळाला साठवण तलाव भेट
साईसंस्थानला मिळाला साठवण तलाव भेट
http://epaper.lokmat.com/EpaperImages//ngr//1882016//d18897-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_982.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_982.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago