संवत्सरनजीक साईभक्तांना लुटले ; कोपरगाव ; १२ ऑगस्ट रोजी नागुपर हायवेने येत असताना लहान मुलीने वांती केल्याने कपडयावरील डाग धुण्यासा...
संवत्सरनजीक साईभक्तांना लुटले ;
कोपरगाव ;
१२ ऑगस्ट रोजी नागुपर हायवेने येत असताना लहान मुलीने वांती केल्याने कपडयावरील डाग धुण्यासाठी पहाटे चार साडेचार वाजेच्या सुमारास संवत्सर शिवारातील रेल्वे पुलाच्या पुढे थांबले असताना तेथे आलेल्या २0 ते २५ वयोगटातील सावळ्या व सडपातळ शरीराचे शर्ट व पॅन्ट घातलेल्या पायी चालत असलेल्या चार अनोळखी इसमांनी हातातील काठीने व लाथाबुक्?यांनी फियार्दी व गाडीतील कुटूंबाला मारहाण करून त्यांना चाकुचा धाक दाखवुन, धमकावुन दागिण्यांसह १ लाख १९ हजार रूपयांचा ऐवज लुटून नेला असल्याची रस्ता लुटीची तक्रार कोपरगाव शहर पोलीसात दाखल करण्यात आली आली आहे.
याबाबत हकीगत अशी की, तेलंगणा राज्यातील हैद्राबाद जि. रंगारेडडी्? हे आपल्या कुटूंबासह साईदर्शनासाठी शिर्डीकडे येत होते. १२ ऑगस्ट रोजी पहाटे चार साडे चार वाजेच्या सुमारास मुलाने वांती केल्याने संवत्सर शिवारातील रेल्वे ब्रिजनजीक कपडे धुण्यासाठी उतरले कपडे धुत असताना आलेल्या चार अनोळखी इसमांनी काठी व लाथाबुक्?यांनी मारहाण करून चाकुचा धाक दाखवुन ५ हजाराचा मोबाईल, ७0 हजारांची सोन्याचे तीन तोळयाचे मंगळसुत्र, वडीलांच्या खिशातील २0 हजाराची रोकड, भाच्याच्या खिशातील १४ हजारांची रोकड, १0 हजाराच्या बॅगा व कपडे असा सर्व १ लाख १९ हजाराचा ऐवज लुटून नेला. याबाबत प्रकाश काशा गौड कोला वय-३0 यांनी कोपरगाव शहर पोलीसात तक्रार दिली असुन पोलीसांनी अज्ञात आरोपीविरोधात रस्ता लुटीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोनि विकास देवरे करीत आहेत. दरम्यान घटनेचे वृत्त कळताच उपविभागीय अधिकारी विवेक पाटील,कोपरगाव शहर पो.स्टेचे पो.नि सुरेश शिंदे यांनी भेट दिली व माहिती घेतली









